---Advertisement---

सिरिया हादरला, इस्रायलने डागले क्षेपणास्त्र, १५ जणांचा मृत्यू

---Advertisement---

नवी दिल्ली : इस्रायलने सीरियाची राजधानी दमिश्कमधील निवासी इमारतीवर क्षेपणास्त्र डागल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे.

सुत्रानुसार, रविवारी सकाळी इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर क्षेपणास्त्र डागत मोठा हल्ला केला. इस्रायलने थेट रहिवाशी इमारतीवर हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर अनेक जण हल्ल्यात जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भूकंपाने हादरलेल्या सीरियावर   इस्रायलने क्षेपणास्त्र डागल्याने संकटात आणखी भर पडली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment