IND vs ENG : गेल्या वेळेस काय झालं होतं, कुणाला माहितीय ?, टीम इंडियाला इंग्लंडने डिवचलं

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. आता टीम इंडिया सेमी फायनलमध्ये २७ जूनला इंग्लंडशी भिडणार आहे. मात्र, त्या आधी इंग्लंडने टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

इंग्लंड क्रिकेट या एक्स (आधीचं ट्विटर) अकाउंटवरुन एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये सेमी फायनल सामन्याची तारीख, वेळ आणि स्टेडियमचा उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर याचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. इंग्लंड सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहे, असं या फोटोच्या पट्टीवर म्हटलंय. तसेच ‘गेल्या वेळेस काय झालं होतं कुणाला माहितीय ?’, असा प्रश्न करत टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आमनासामना झाला होता. तेव्हा इंग्लंडने टीम इंडियाला पराभूत करुन फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्याच अनुषगांने इंग्लंडने ट्विट करत भारतीय चाहत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत सडेतोड उत्तर दिलंय. ऑस्ट्रेलियानंतर आता तुमचा हिशोब चुकता करण्याची वेळ आहे, असंही चाहत्यांनी म्हटलंय.