T.N. Padavi : आदिवासींच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण व्हावे !

नंदुरबार : आदिवासी समाजाची संस्कृती व इतिहास अत्यंत गौरवशाली असून त्याचे स्मरण वारंवार करून जतन केले पाहिजे तरच आदिवासी समाजातील युवक-युवतींना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन एकलव्य विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख टी. एन. पाडवी यांनी आज ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला देवमोगरा माता व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सुहासिनी नटावदकर होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वर्षा घासकडबी यांनी केले. जागतिक स्तरावर हा दिवस का पाळला जातो याविषयी त्यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आरती पवार हीने मनोगत व्यक्त केले.

आपली संस्कृती जपण्यासाठी सर्व तरूण तरूणींनी पुढे यावे असे आवाहन तिने केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्या सौ. सुहासिनी नटावदकर यांनी केला. आपल्या इतिहासाला स्मरून सर्व विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वाढवावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले. आभार  वर्षा घासकडबी यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यार्थिनी मोहिनी वसावे व समुहाने आदिवासी नारी हे नृत्य सादर केले. यावेळी शाळेतील आदिवासी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन प्रा.  मिनल वसावे यांनी केले.या कार्यक्रमाला पर्यवेक्षक एस एफ सोनार, डॉ. गिरीश पवार,प्रा.एस के चौधरी,प्रा.कृष्णा गांधी, प्रा. अन्नदाते, प्रा. सुवर्णा गिरासे व समस्त प्राध्यापक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.