T20 WC 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत टी २० विश्वचषकाच्या थरार रंगण्यास सुरुवात झाली आहे. १ जूनपासून ICC T २० वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असताना, दुसरीकडे भारताची वर्ल्डकपमधील पहिली मॅच ४ जूनला होणार आहे. तर भारत- पाकिस्तान न्यूयॉर्क येथे ९ जूनला एकमेकांविरुद्ध खेळतील. दरम्यान, पाकिस्तानचा मर्यादित षटकांचा कर्णधार बाबर आझम यांनी कोहलीविरुद्ध निच्छितच विशेष योजना आखली जाणार असल्याचे सांगितले आहेत.
विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध नेहमी चांगली कामगिरी केली आहे. अनेकवेळा विराट कोहलीच्या दमदार खेळीने पाकिस्तानच्या हातून विजय हिचकवला आहे. त्यामुळे यंदा होणाऱ्या टी २० विश्वचषकात पाकिस्तानला कोहलीची बॅट शांत ठेवण्यासाठी योजना आखणे आवश्यकच आहेत.
काय म्हणाले बाबर आझम ?
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाबर म्हणाला की, विराट कोहली भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. आगामी टी-२० विश्वचषकात नक्कीच त्याचा प्रभाव दिसून येईल. त्याची बॅट शांत ठेवण्यासाठी नक्कीच योजना आखली जाईल. आम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या सर्व ११ खेळाडूंविरुद्ध योजना आखतो. न्यूयॉर्कमधील परिस्थितीची आम्हाला फारशी माहिती नाही. पण, एक नक्की की, कोहलीविरुद्ध निश्चितच विशेष योजना आखली जाईल. तो सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.