T20 world Champion Team India : अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल झाला.
चर्चगेट रेल्वे स्थानकावर तरुणांच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आला आहे. हजारो तरुण इथून मरीन ड्राईव्हच्या दिशेला निघाले आहेत. या तरुणांकडून टीम इंडियाच्या जयघोषाच्या घोषणाबाजी करण्यात येत आहेत. #TeamIndia #Mumbai #mumbai #wankhedestadium #churchagate #RohitSharma #MarineDrive… pic.twitter.com/4JSqZJdJNa
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2024
संघाने भारतात दाखल झाल्यानंतर प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर हवामान खराब असल्यानं टीम इंडिया मुंबईत उशीराने दाखल झाली.
मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांची अफाट गर्दी #TeamIndia #Mumbai #mumbai #wankhedestadium #churchagate #RohitSharma #MarineDrive #mumbainews pic.twitter.com/SAHlAMLYX3
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2024
विमान तळावरून टीम इंडिया बसमधून रवाना झाली. दरम्यान, मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची प्रचंड गर्दी आहे. अनेक चाहते रोहित शर्मासाठी तुफान पावसात देखील रस्त्यावर उतरले आहे.
क्रिकेट चाहत्यांची तुफान गर्दी, असं दृश्य फार कमी वेळा बघायला मिळेल. #TeamIndia #Mumbai #mumbai #wankhedestadium #churchagate #RohitSharma #MarineDrive #mumbainews pic.twitter.com/LkRidTxNxD
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2024
भारताला हा विजय मिळवून दिल्याबद्दल मुंबईतील चाहते टीम इंडियाचं प्रचंड कौतुक करत आहेत. टीम इंडियाचे लाखो चाहते आज मुंबईत रस्त्यावर उतरले आहेत.
वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट चाहत्यांची तुफान गर्दी जमा झाली आहे. क्रिकेट चाहत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.#TeamIndia #Mumbai #mumbai #wankhedestadium #churchagate #RohitSharma #MarineDrive #mumbainews pic.twitter.com/63UbEbuwMj
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2024
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात टीम इंडियाच्या स्वागतासाठी विजयी यात्रा आयोजित करण्यात आली आहे. नरीमन पॉईंटच्या एनसीपीए पासून वानखेडे स्टेडियम अशी ही मिरवणूक काढण्यात आली आहे.
मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दीच गर्दी #TeamIndia #Mumbai #mumbai #wankhedestadium #churchagate #RohitSharma #MarineDrive #mumbainews pic.twitter.com/jWjJ6UanWW
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2024
या मिरवणुकीसाठी लाखो चाहते मरीन ड्राईव्हर आले आहेत. यामध्ये तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तसेच वानखेडे स्टेडियममध्येही भरगच्च गर्दी जमलेली आहे. क्रिकेट चाहत्यांच्या सेलिब्रेशनचे स्पेशल 5 व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.