T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्या कुणाला संधी, कुणाला डच्चू ?

T20 World Cup 2024 : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाची कॅपटन्सी करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. तसेच युझवेंद्र चहल याची अनेक महिन्यानंतर टीम इंडियाची रिएन्ट्री झाली आहे. एका बाजूला अनेक खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला काही खेळाडूंना संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भारतीय फलंदाजीची जबाबदारी पूर्णपणे रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली यांच्या खांद्यावर असेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करेल. फिरकी विभागात युझवेंद्र चहलचे पुनरागमन झाले आहे. म्हणजेच कुलचा जोडी २०२४ च्या टी२० विश्वचषकात पुन्हा धुमाकूळ घालताना दिसणार आहे. याशिवाय हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा हे खेळाडू संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

T20 विश्वचषक 2024 या वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार ही स्पर्धा २ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र, यामध्ये भारतीय संघ ५ जूनला आयर्लंडविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 29 जूनपर्यंत चालणाऱ्या या ICC स्पर्धेत 9 जून रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. यावेळी प्रथमच 20 संघ T20 विश्वचषकात सहभागी होत असून, त्यांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत स्पर्धेच्या अ गटाचा भाग आहे, ज्यामध्ये पाकिस्तान, आयर्लंड, यूएसए आणि कॅनडा या संघांचाही समावेश आहे.

T20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडिया
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.