T20 World Cup 2024 : टीम इंडिया आज होणार न्युयॉर्कला रवाना, पहिल्या बॅचमध्ये आहेत ‘हे’ खेळाडू

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 1 ते 29 जून दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची पहिली बॅच आज शनिवार, 25 रोजी रात्री मुंबईतून दुबईमार्गे न्युयॉर्कला रवाना होणार आहे. यात कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव असे काही प्रमुख खेळाडू असणार आहेत.

भारताचा या टी20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना 5 जून रोजी होणार आहे, पण त्याआधी 1 जून रोजी भारताचा बांगलादेशविरुद्ध सराव सामना होणार आहे. त्याआधी भारतीय संघ दोन बॅचमध्ये न्युयॉर्कला जाणार आहेत.

भारतात सध्या जरी आयपीएल सुरु आहे. त्याचमुळे भारतीय संघातील खेळाडू दोन बॅचमध्ये न्युयॉर्कसाठी रवाना होणार आहेत. त्यानुसार पहिली बॅच शनिवार, 25 रोजी रात्री मुंबईतून दुबईमार्गे न्युयॉर्कला जाईल. पहिल्या बॅचमध्ये कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव असे काही प्रमुख खेळाडू असणार आहेत. या खेळाडूंच्या संघांचे आयपीएलमधील आव्हान आधीच संपलेले आहे.