T20 World Cup 2024 Final : ‘जेव्हा मी पाहतो तेव्हा…’, बॉलिवूडचे बिग बी यांनी पाहिली नाही मॅच ? सांगितलं कारण

T20 World Cup 2024 Final : बार्बाडोसच्या मैदानावर तब्बल १७ वर्षांनी भारतीय संघाने इतिहास रचला. वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच कल्ला करण्यात आला. चाहत्यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. मात्र संपूर्ण देश जी मॅच डोळ्यात तेल घालून पाहत होता ती मॅच बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी पहिलीच नाही. त्यांनी एक पोस्ट करत त्याचं कारण सांगितलं आहे.

 

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, वर्ल्ड चॅम्पियन भारत…, भारत माता की जय… जय हिंद, जय हिंद, जय हिंद… याशिवाय अमिताभ बच्चन यांनी त्यांनी लिहिले की, उत्साह…भावना…सगळे घडले…पण मी टीव्ही पाहिला नाही, कारण जेव्हा मी पाहतो तेव्हा आपण हारतो…

आता अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली ही पोस्ट व्हायरल होताना दिसतंय. अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, मी ज्यावेळी भारताचा सामना बघतो, त्यावेळी भारत हारतो म्हणून मी सामना पाहत नाही. फक्त अमिताभ बच्चन यांनीच नाही तर जवळपास सर्वच कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.