T20 World Cup 2024 : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याला आता काही तास उरले आहे. या मॅच आधी टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादवला एक वाईट बातमी मिळाली आहे. सूर्यकुमार यादव आता T20 क्रिकेटमध्ये जगातील नंबर 1 फलंदाज राहिलेला नाही.
सूर्यकुमार यादवची जाग ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडने घेतली आहे. बुधवारी जारी झालेल्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा हा फलंदाज टॉपवर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवने या टुर्नामेंटमध्ये दोन हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो 31 धावा करु शकला. बांग्लादेश विरुद्ध फक्त 6 रन्स करु शकला. त्यामुळे सूर्याला त्याचं नंबर 1 च स्थान गमवाव लागलं आहे.
मात्र, सूर्यकुमार यादवला पुन्हा एकदा नंबर 1 टी-20 फलंदाज बनण्याची संधी आहे. सूर्यकुमारला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळायचे असून संघ जिंकल्यास त्याला अंतिम फेरीत खेळण्याची संधीही मिळेल. सूर्याने दोन्ही सामन्यात मोठी खेळी केली तर तो अव्वल स्थानावर नक्कीच पोहोचेल. चांगली गोष्ट म्हणजे इंग्लंडविरुद्ध त्याची बॅट नेहमी तळपली आहे. सूर्याने इंग्लंडविरुद्ध ४५ पेक्षा जास्त सरासरीने २७४ धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचाही समावेश आहे. सूर्याचा स्ट्राईक रेटही 190 पेक्षा जास्त आहे. ट्रॅव्हिस हेडचा नंबर 1 होण्याचा आनंद फार काळ टिकणार नाही हे स्पष्ट आहे.