ख्रिश्र्चन
मणिपूर का धगधगतंय : मणिपुरचे कुकी-म्यानमार, मणिपूर, मिझोरामच्या वांशिक कुकी-चिन-झो समुदायाचा ख्रिश्र्चन राष्ट्रवाद!
मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या दरम्यान महिलांवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देशाचे लक्ष मणिपूरकडे वेधले गेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये वनवासी जातींमध्ये भीषण हिंसाचार सुरू आहे. केंद्र व राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. परंतु जातीय चकमकी चालूच आहेत. हा भीषण संघर्ष आता नैमित्यिक आहे, परंतु वर्षानुवर्षाच्या धार्मिक विद्वेषाची त्याला किनार आहे. काही परकीय शक्ती मणिपूरमध्ये कार्यरत असून, काही ठरावीक गटांना त्यांचा पाठिंबा आहे. मणिपूरमधील परिस्थिती अशांत का झाली? याची सविस्तर माहिती देणारी विशेष लेखमाला...