तरुण भारत लाईव्ह ।२८ फेब्रुवारी २०२३। चांगली नोकरी मिळण्यासाठी चांगले शिक्षण घेणे फार आवश्यक आहे. चांगल्या खासगी नोकरीसाठी कौशल्य अभ्यासक्रमही करावा. तरच चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची आशा आहे. असे अनेक कौशल्य-विकास करणारे अभ्यासक्रम आहेत, जे विनामूल्य करून सुधारता येतात.
नोकरी करण्यासाठी आपल्यामध्ये काही कौशल्य असणे गरजेचे असते. आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज जास्त असणे हे देखील महत्वाचे आहे. नोकरी मिळण्यासाठी आपण वेगवेगळे कोर्सेस करत असतो. पण हे कोर्सेस खूप खर्चिक असतात. तर यासाठी जगातील सर्वात मोठी कंपनी गुगलने तरुणांसाठी खास ऑनलाइन कोर्सेस आणले आहेत. तरुण वर्ग यापैकी एक कोर्स करून नोकरी मिळवू शकतो. हे कोर्स मोफत केले जाऊ शकतात. तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र देखील देण्यात येते. गुगलकडून या 4 मोफत ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये डिजिटल मार्केटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि व्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
डिजिटल मार्केटिंग कोर्स
गुगल कंपनी कडून तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स करण्याची संधी दिली जात आहे. गुगलकडून डिजिटल मार्केटिंग कोर्स पूर्णपणे मोफत दिला जात आहे. तुम्ही घरबसल्या हा डिजिटल मार्केटिंग कोर्स तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या मदतीने पूर्ण करू शकता. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गुगलकडून प्रमाणपत्र दिले जाईल.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप वेगाने वाढत आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजेंस एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने बहुतेक काम पूर्ण केले जात आहे. चॅटजीपीटी हे त्याचे प्रमुख उदाहरण आहे. तुम्ही गुगल ने ऑनलाइन सुरू केलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स मोफत करू शकता.
मशीन लर्निंग कोर्स
मशीन लर्निंग कोर्स तुम्ही हा कोर्स केल्यास तुम्हाला भारतातील आणि परदेशातील विविध कंपन्यांमध्ये फ्रीलांसर किंवा पूर्णवेळ कर्मचारी म्हणून नोकरी मिळू शकते. हा कोर्स गुगलकडून पूर्णपणे मोफत दिला जात आहे. या कोर्सनंतर तुम्हाला घरबसल्या कोणत्याही खाजगी कंपनीत नोकरी मिळू शकते. तसेच तुम्हाला नोकरी मिळाल्यानंतर लाखो रुपये पगार मिळू शकतो.
व्यवसाय अभ्यासक्रम
सध्या सर्व व्यवसाय ऑनलाइन होत आहेत. सर्व कंपन्या डायरेक्ट-टू-कंझ्युमर द्वारे त्यांची उत्पादने विकत आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवसायात मोठी भर पडली आहे. अशा परिस्थितीत, गुगल फ्री बिझनेस कोर्समध्ये तुम्हाला बिझनेस स्ट्रॅटेजी, लोकल मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, ई कॉमर्स, डी2सी या सर्व गोष्टी शिकवल्या जातात.