---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव :अमरावती येथील रोहन डेंडूळे यांचे मालेगाव येथे मंगळवारी लग्न होते.त्यांच्या सोबत आणखी पाच जण गाडी क्रमांक एम.एच २७ बी .व्ही. ७९५६ या कारने अमरावती येथून मालेगाव येथे या विवाह सोहळ्यासाठी जात असतांना भडगाव तालुक्यातील कजगाव गावाजवळ कारची वायर जळाल्याचे कार चालक राहुल वैराळे याच्या लक्षात आल्याने प्रसंगावधान राखत तात्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेतली.स्वतः व कारमधील नवरदेव तसेच इतर चार जणांना बाहेर उतरविले,सर्व जण बाहेर पडताच कारला आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जीवित हानी टाळली .
---Advertisement---