Taloda : सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च अश्वत्थामा शिखरावर झाली प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा

Taloda : शहरातील रामभक्तांनी सातपुड्याच्या पर्वतराजित चिरंजीवी असलेले रामभक्त हनुमान यांना साक्ष ठेवून अश्वत्थामा शिखरावर जाऊन दीपोत्सव साजरा केला.
22 जानेवारी रोजी दुपारी 12 :30 वाजता अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजनाच्या पार्श्वभूमीवर तेथील वेळेचे नियोजन व मूल्यमापन करत तळोदा येथील रामभक्त अजित पवार ,अनिल पवार व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष हेमलाल पुरुषोत्तम मगरे यांच्या संकल्पनेने 12 जणांचा चमु सातपुड्याचे आध्यात्मिक वैभव असलेले चिरंजीवी अश्वत्थामा ऋषी शिखराकडे रवाना झाला.
दरम्यान सकाळी या चमूने दलेलपूर रोड वरील नवसाला पावणारे श्री. रोकडमन हनुमान मंदिर येथे शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते पहाटे सहा वाजता विधिवत आरती व 56 भोग समर्पण कार्यक्रमाला हजेरी लावली . तेथून सर्व अश्वत्थामा शिखराकडे निघाली. दुपारी बारा वाजता चमू शिखरावर पोहोचला. तेथे श्री.अश्वस्थामा ऋषी यांच्या मूर्तीचे पंचामृत स्नान करून विधिवत पूजन केले. श्रीरामांची प्रतिमा ठेवून 21 दीपक प्रज्वलीत करत सामूहिक रामरक्षा स्त्रोत्र व हनुमान चालीसा पठण करण्यात आली.

शिखरावर भगव्या ध्वजा बरोबर राम ध्वज स्थापित करून राम नामाचा जयघोष करण्यात आला. आस्था ही जोपासण्याची गोष्ट असून ती मनोभावे केली पाहिजे ही गोष्ट या चमुच्या संकल्पना व समर्पणाने आज युवा वर्गाला संदेश देणारी ठरली आहे.या भा . ज. पा . शहर उपाध्यक्ष दिगंबर सूर्यवंशी,कांतीलाल पवार,गणेश पवार,दीपक सूर्यवंशी,राजेंद्र पवार,जगदीश शिरसाठ, दीपक सूर्यवंशी,जिग्नेश सूर्यवंशी व उदय पवार यांच्या समावेश होता.