तळोदा (दि. २८) : तळोदा शहरातील स्मारक चौकात एका इमारतीवर अनधिकृत बॅनर लावण्यात आल्यामुळे नगर परिषदेत मोठी चर्चा निर्माण झाली आहे.
या बॅनरवर “प्रशासक नंतर तळोदा शहराची अवस्था” असे लिहिले असून, हे बॅनर नगर परिषदेची परवानगी न घेता लावल्याने शहरात चर्चेला उधाण दिलं आहे.
तळोदा नगर परिषदेतर्फे याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅनर लावण्यासाठी पूर्वपरवानगी न घेणाऱ्या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
तळोदा नगर परिषदेकडून ही कारवाई अंमलबजावणी समितीचे नोडल अधिकारी, दिपक शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे.
पोलिस सुत्रांनी सांगितले की, या प्रकरणाचा पुढील तपास कॉ. वनसिंग पाडवी करत आहेत. दरम्यान, तळोदा शहरातील बॅनर लावण्याच्या या प्रकारामुळे शहरात चर्चेला उधाण दिलं आहे.