Tamim Iqbal : भारतात १८व्या इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम सुरु असून, आज सोमवारी विशाखापट्टणम् येथे अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायण्ट्स यांच्यादरम्यान टी२० क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. दुसरीकडे, बांग्लादेशातदेखील ढाका प्रीमियर लीग (डीपीएल) सुरु आहे. दरम्यान, माजी कर्णधारला मॅच खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याला हेलिकॉप्टरने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तमीम इक्बाल याला मॅच खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याला तातडीने हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल आले आहे. मात्र, तमीम इक्बालचा वैद्यकीय अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) डॉक्टर देबाशिष चौधरी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
सुत्रानुसार, तमीम इक्बाल हा ढाका प्रीमियर लीग (डीपीएल) मध्ये मोहम्मद स्पोर्टिंग क्लबकडून खेळत होता. यात आज मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब हे संघ आमने-सामने होते.
दरम्यान तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याला हेलिकॉप्टरने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तमीम इक्बालचा वैद्यकीय अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) डॉक्टर देबाशिष चौधरी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.