मोठी बातमी; टाटाच्या कार महागणार

तरुण भारत लाईव्ह । २८ जानेवारी २०२३। ऑटोमोबाइल कंपनी टाटा मोटर्स ने आपल्या पॅसेंजर कारच्या किंमतीत वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे. या कारच्या किमतींमध्ये किती वाढ होणार आणि यामध्ये कोणकोणत्या कारचा समावेश आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी २०२३ पासून नेक्सॉन, पंच, टियागो, टिगोर, अल्ट्रोज, हॅरियर आणि सफारी कारच्या किंमतीत वाढ करण्यात येणार आहे. कारच्या इनपूट कॉस्ट वाढल्याने कारच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्या वेळोवेळी आपल्या कारच्या किंमतीत वाढ करते. यावर्षी टाटा मोटर्स आपल्या कारच्या किंमतीत १.२ टक्के वाढ करणार आहे. टाटाच्या इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. टाटा इंडियन मार्केटमध्ये नेक्सॉन ईव्ही प्राइम, नेक्सॉन ईव्ही मॅक्स, टियागो ईव्ही आणि टिगोर ईव्ही सारख्या कारची विक्री करते. तुम्हाला जर टाटाची कार खरेदी करायची असेल तर तुम्ही या महिन्यात स्वस्त किंमतीत खरेदी करू शकतात.

टाटा मोटर्स यावर्षी आपल्या सफारी आणि हॅरियरचे अपडेटेड मॉडलला लाँच करणार आहे. या एसयूव्ही मध्ये पेट्रोल इंजिन सोबत खूप सारे फीचर्स पाहायला मिळतील. यासोबत टाटाच्या आणखी दोन सीएनजी कार सुद्धा लाँच होणार आहेत. आगामी काळात हॅरियरचे इलेक्ट्रिक व्हेरियंट लाँच करण्यात येणार आहे. ज्यात चांगली रेंज आणि स्पीड मिळण्याची शक्यता आहे. तसेच कर्व ईव्ही आणि अविन्या ईव्ही सुद्धा लाँच करण्यात येणार आहे.