टाटाने लाँच केली सीएनजी हॅचबॅक कार; जाणून घ्या फीचर्स

तरुण भारत लाईव्ह । २४ मे २०२३। तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नुकतंच टाटा ने आपली नवीन कार लाँच केली आहे. अल्ट्रॉझ आय सीएनजी असं या कारचं नाव आहे. या गाडीची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

टाटाने अल्ट्रॉझ आय सीएनजीला सहा वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध केलं आहे. यामध्ये एक्सई, एक्स एम+, एक्स एम+ (एस), एक्सझी, एक्सझी+ (एस) आणि एक्सझी+ (ओ) असे हे व्हेरियंट आहेत. अल्ट्रॉझचे सीएनजी मॉडेल हे दिसायला बऱ्याच अंशी याच गाडीच्या पेट्रोल व्हेरियंट प्रमाणेच आहे.

टाटाने या गाडीमध्ये पहिल्यांदाच ३० लीटर क्षमतेचे दोन सीएनजी टँक बसवले आहेत. हे सिलेंडर बूट फ्लोअरच्या खाली असल्यामुळे कारमध्ये भरपूर बूट स्पेस मिळते. गाडीच्या आतमध्ये एक सात इंचांची टचस्क्रीन पॅनल मिळते. याला अँड्रॉईड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी मिळते. सोबतच, एअर प्युरीफायर, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि इतर अनेक फीचर्स मिळतात.

अल्ट्रॉझच्या सीएनजी व्हेरियंटमध्ये एक व्हॉइस अ‍ॅक्टिव्हेटेड, सिंगल-पेन सनरूफही देण्यात येत आहे. अल्ट्रॉझ सीएनजीच्या एक्सएम+ (एस), एक्सझी+ (एस) आणि एक्सझी+ ओ (एस) या व्हेरियंट्समध्ये सनरुफ उपलब्ध असणार आहे.

अल्ट्रॉझ सीएनजीची एक्स शोरूम बेस प्राईज ही ७.५५ लाख रुपये आहे. याच सेगमेंटमध्ये येणाऱ्या बलेनो किंवा ग्लान्झाच्या तुलनेत ही किंमत कमी असल्यामुळे ग्राहक या कारला अधिक पसंती देतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.