तरुण भारत लाईव्ह । १६ मार्च २०२३। मागील काही दिवसापासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरु आहे. यादरम्यान, अनेक शेअर देखील घसरले आहे. त्यात एका दिवसाच्या वाढीनंतर टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसलिमिटेडचे शेअर्स आज पुन्हा एकदा जमिनीवर आले आहेत. टेलिकॉम सेक्टरच्या या शेअरमध्ये बुधवारी बंपर तेजी दिसली होती, परंतु आज गुरुवारी सकाळी 10.15 च्या सुमारास TTML शेअर्स 3.37 टक्क्यांनी घसरून 58.80 रुपयांवर व्यवहार करत होते.
सहा महिन्यापूर्वी म्हणजेच 16 सप्टेंबर 2022 मध्ये या शेअरची किंमत 118.25 रुपये इतकी होती. 28 फेब्रुवारी 2023 रोजी शेअरची किंमत 52.10 रुपये होती, जी 52 आठवड्यांची नीचांकी आहे. एका वर्षात, यामुळे गुंतवणूकदारांचे बरेच नुकसान झाले आहे.
या कालावधीत टीटीएमएल 52.98 टक्क्यांनी घसरला आहे. या वर्षी आतापर्यंत 35 टक्क्यांहून अधिक नकारात्मक परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत त्याने आपल्या भागधारकांचे पैसे निम्मे केले आहेत.