विजय बाविस्कर
पाचोरा : निर्मल फाउंडेशन संचालित तात्यासाहेब आर. ओ. पाटील विज्ञान, वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालय, पाचोरा या नामवंत शिक्षणसंस्थेने यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत यशाचा नवा अध्याय लिहिला आहे.
या यशस्वी निकालात देव प्रणव प्रदीप याने 86.67% गुणांसह महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. राठोड श्रुती प्रकाश हिने 83% गुणांसह द्वितीय स्थान मिळवले तर आदित्य अनंत पाटील याने 74.17% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून आपल्या कष्टाचे चीज केले. या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने विद्यालयाचे नाव उज्ज्वल करत, समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल महाविद्यालयाच्या अध्यक्षा आदरणीय वैशालीताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्या सौ. स्नेहल पाटील तसेच संपूर्ण शिक्षकवर्ग यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
यशाच्या या शुभप्रसंगी विद्यालयाच्या शिक्षणातील गुणवत्ता, शिस्त आणि सुसंस्कारित वातावरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या घवघवीत यशासाठी विद्यार्थ्यांचे कष्ट, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे निस्वार्थ मार्गदर्शन निश्चितच प्रेरणादायी आहे.