---Advertisement---

‘माझ्याशी लग्न करशील का ?’, शिक्षिकेचा विद्यार्थ्याला प्रोपोज; उत्तर ऐकून तिने थेट कापली आयुष्याची दोर

---Advertisement---

मध्य प्रदेश : प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाच्या मनात असते. केव्हा, कधी आणि कुठे कोणावर प्रेम होईल हे सांगता येत नाही. अनेक जण आपलं प्रेम व्यक्त करण्यात यशस्वी होतात, तर काहींना प्रेम व्यक्त करता येत नाही. बऱ्याच वेळा प्रेमभंगातून धक्कादायक प्रकार समोर आले आहे. अशातच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका शिक्षिकेला तिच्याच विद्यार्थ्यावर प्रेम झाले. तिने विद्यार्थ्याला विचारले ‘तू माझ्याशी लग्न करशील का? विद्यार्थ्याने असे उत्तर दिले की ते ऐकून शिक्षिकेने थेट आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

मध्य प्रदेशच्या खंडवा येथे ही घटना उघडकीस आली आहे. आयटीआय महाविद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असलेली २४ वर्षीय प्रिया यादव ही विद्यार्थी सपन यादव याच्या प्रेमात पडली. तिने जेव्हा सपनला ‘तू माझ्याशी लग्न करशील का? असे विचारले, तेव्हा त्याने लग्न करण्यास नकार दिला. यातून तणावात जाऊन प्रिया हिने घरात गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले.

---Advertisement---

पोलिस चौकशीत सपनने सांगितले की तो आयटीआय नर्मदा नगर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. येथे प्रिया काही वर्षांपासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. गेल्या एक वर्षांपासून दोघे प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच जातीचे होते, विशेषतः कुटुंबातील सदस्यांनाही या नात्याची माहिती होती.

दरम्यान, प्रियाने सपनला तिच्या घरी बोलावले आणि त्याच्याशी लग्न करण्याबद्दल विचारले. यावर सपन याने, त्याला आधी स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. त्यानंतरच लग्न करेल, असे सांगितले. हे ऐकून प्रिया रागावली. तिने तिचा मोबाईल जमिनीवर फेकून तोडला. नंतर ती खोलीत गेली. सुमारे अर्धा तास ती खोलीतून बाहेर न आल्याने तो टेरेसवर गेला. खिडकीतून डोकावून पहिले असता प्रियाने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.

सुसाईड नोट

असे सांगितले जात आहे की, प्रियाने एक सुसाईड नोट देखील लिहिली होती. यामध्ये तिने जीवनातील आशा गमावल्याबद्दल बोलले होते. तथापि, तिने कोणाचेही नाव लिहिले नव्हते. सध्या पोलीस या प्रकरणात सपनची चौकशी करत आहेत. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. दुसरीकडे, प्रियाच्या कुटुंबातील सदस्य असह्य झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---