Pachora News : प्रांगणात खेळत होते विद्यार्थी, मधली सुट्टी संपली अन् वर्गात जाताच समोरचं दृश्यपासून हादरले !

---Advertisement---

 

पाचोरा : शाळेच्या मधल्या सुट्टीत एका ४२ वर्षीय शिक्षकाने वर्गातच आयुष्याची दोर कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सुपडू भादू पाटील शाळेत ही घटना उघडकीस आली. रविंद्र भारत महाले (४२) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाचोऱ्याच्या दहीगाव येथे महाले हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. शाळेच्या मधल्या सुट्टीत विद्यार्थी प्रांगणात खेळत असताना महाले यांनी वर्गात आयुष्याची दोर कापली. मधली सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थी वर्गात गेले असता त्यांना महाले गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. याबाबत विद्यार्थ्यांनी शिक्षकांना माहिती दिली.

शिक्षकांनी पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम, पोलीस हवालदार योगेश पाटील, हरीश परदेशी, संतोष राजपूत वाहनचालक संभाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

रुग्णवाहिका चालक बबलू मराठे, किशोर लोहार व अमोल पाटील यांच्या मदतीने महाले यांना खाली उतरवून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मयताचे डॉ. विजय पाटील यांनी तपासणीअंती महाले यांना मृत घोषित केले. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

कारण अस्पष्ट

महाले हे बोलक्या स्वभावाचे म्हणून परिचित होते. मात्र, त्यांच्यावर ही वेळ का आली ? त्यांनी एवढे मोठे पाऊल का उचलले असेल ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, महाले यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---