---Advertisement---

संतापजनक! व्हिडीओ कॉल करून शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत करायची अश्लील चाळे; असा झाला भंडाफोड

---Advertisement---

---Advertisement---

Koparkhairane crime : व्हिडीओ कॉलवरून अश्लील चाळे दाखवत शिक्षिका विद्यार्थ्यांना उत्तेजित करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थ्यासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

कोपरखैरणेतील एका शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारी ही ३५ वर्षीय शिक्षिका तिच्याच वर्गातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांना उत्तेजित करत होती. यासाठी ती स्वतःचे अर्धनग्न फोटो, व्हिडीओ त्यांना इन्स्टाग्रामवर पाठवत होती. त्याशिवाय व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करायची. मात्र, एका विद्यार्थ्यासोबत तिच्या अशा चाळ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भंडाफोड झाला.

ही शिक्षिका उलवे परिसरात राहणारी असून तिने इतरही काही अल्पवयीन विद्यार्थ्यांना अशाप्रकारे उत्तेजित करून गळाला लावल्याची शक्यता आहे. तिने त्यांच्यासोबत गैरकृत्य केले आहे का? याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

खेवलकर यांना ट्रॅप लावण्यासाठी ‘ती’ला तिथे आणले का ?

पुणे : आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर पार्टीत ट्रॅप लावला आणि ताब्यात घेतले. पिशवीच २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आले? संबंधित महिलेला पार्टीला बोलावण्यात आलेले नव्हते. तरी ती कशी आली? असे अनेक प्रश्न खेवलकर यांच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित केले आहे.


खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला की, रिमांड रिपोर्टमध्ये काय जप्त करायचे आहे, याचा उल्लेख नाही. अमली पदार्थ कोणाच्या बॅगमधून आले? तर ईशा सिंग यांच्या बॅगमधून आले. जे व्हिडिओ व्हायरल केले त्यात सुद्धा दिसत आहे की तिच्या बॅगमध्ये अमली पदार्थ आहेत. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, पोलिसांनी सीडीआर मिळवला आहे. त्यात राहुल नावाचा व्यक्ती निष्पन्न झाला आहे. त्याचा पार्टी मधील काय सहभाग आहे, हे अजून तपासायचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---