---Advertisement---

शिक्षकच बनला भक्षक! जळगाव जिल्ह्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना समोर येत असून, यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूर, अकोला आणि पुण्याच्या घटनेनंतर आता जळगाव जिल्हयात एक संतापजनक घटना समोर आली आहे.

जळगावच्या एरंडोल तालुक्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका शिक्षकाने शाळेतील स्टॉप रूममध्ये बोलवीत नववीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. शिवाय शिक्षकाने मुलीला मिठी मारत तिचे चुंबन घेऊन अशिल कृत्य केले.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस स्थानकात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. बदलापूर, अकोला आणि पुण्याच्या घटनेनंतर आता जळगाव जिल्हयात अशी घटना समोर आल्याचे प्रचंड संताप व्यक्त होत आहेत.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment