विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

राजस्थान :  गंगरार ब्लॉकमधील अजोलिया खेडा ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सालेरा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिक्षक आणि शिक्षिकेचे कार्यालयात अश्लील कृत्य करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून, शिक्षण विभागाने दोघांनाही तडकाफडकी निलंबित केले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षिका वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. हे दोघेही हायस्कुलच्या कार्यालयात वेगवेगळ्या ठिकाणी अश्लील कृत्य करताना दिसत आहेत.

शिक्षण विभागाने या व्हिडिओंच्या सत्यतेला दुजोरा न देता तातडीने कारवाई करत शिक्षिका आणि शिक्षकाला निलंबित केले आहे. या घटनेची गंभीर चौकशी सुरू असून, शिक्षण विभागाने एक चौकशी समिती स्थापन केली आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत शिक्षक आणि शिक्षिकेच्या बडतर्फीची मागणी केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या घटनांमुळे शाळेचे शैक्षणिक वातावरण आणि मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

या घटनेमुळे शाळेतील नैतिकता आणि शिस्तीचे महत्त्व प्रश्नचिन्हाच्या अधीन झाले आहे. शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे ग्रामस्थांचा आग्रह आहे.

शिक्षण विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सर्वांगिण तपासणी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.