---Advertisement---
Asia Cup 2025 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव कर्णधार, तर उपकर्णधार म्हणून शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. तर काही खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. यात कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे हे जाणून घेऊयात.
भारतीय निवडकर्त्यांनी आशिया कपसाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या टीम इंडियाच्या सलामी जोडीवर विश्वास ठेवला आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा हा टी-२० क्रमवारीत जगातील नंबर वन फलंदाज आहे. त्याच्याशिवाय, टी-२० क्रमवारीत जगातील नंबर २ फलंदाज तिलक वर्मा यांचीही आशिया कपसाठी निवड करण्यात आली आहे.
संजू, अभिषेक आणि तिलक टॉप ऑर्डरमध्ये आहेत, तर मधल्या ऑर्डरमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रिंकू सिंग सारख्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. जितेश शर्माचे नाव दुसऱ्या विकेटकीपर फलंदाज म्हणून संघात आहे.
गोलंदाजीच्या आघाडीवर, बुमराह आणि अर्शदीप हे वेगवान आक्रमणाची जबाबदारी सांभाळताना दिसतील. फिरकी गोलंदाजांना बळकटी देण्यासाठी वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांना आशिया कप संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग
राखीव खेळाडू : रियान पराग, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, प्रसीद कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर
या खेळाडूंना डच्चू…
तर चॅम्पियन ट्रॉफीत महत्वपूर्ण कामगिरी केलेल्या श्रेयस अय्यर, के एल राहुल यांच्यासह मोहम्मद सिराज, आकाश दीप यांना डच्चू देण्यात आला आहे.