Team India coach : रिकी पाँटिंग टीम इंडियाबद्दल ‘खोटे’ बोलले, जय शाहांनी सर्वांसमोर केली ‘पोल-खोल’

T20 World Cup 2024 : T20 विश्वचषक 2024 अवघ्या काही दिवसांत सुरू होणार आहे.  यावेळी टीम इंडियाचा विजेतेपदाचा दुष्काळ संपेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. ते होईल की नाही हे जूनच्या अखेरीस कळेल, पण या सगळ्यात अचानक भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाचा मुद्दा चर्चेत आला आहे. बीसीसीआयने नाव न घेता दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगची पोल-खोल केली आहे.

वास्तविक, विश्वचषकानंतर टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे भारतीय बोर्डाने नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत. साहजिकच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबद्दल प्रश्न असेल तर जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांच्या नावांची चर्चा नक्कीच होईल. अशात बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांसारख्या दिग्गजांशी संपर्क साधल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

या याबाबत गंभीरने अद्याप काहीही सांगितलेले नाही, मात्र पाँटिंगने अलीकडेच आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत मोठा दावा केला आहे. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक पाँटिंग म्हणाले होते की, स्पर्धेदरम्यान काही लोकांनी टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला होता आणि त्यांची इच्छा जाणून घेतली होती. पॉन्टिंगने बीसीसीआयचे थेट नाव घेतले नसले तरी, त्याने वैयक्तिकरित्या काही लोकांशी समोरासमोर बोलल्याचे सांगितले.

जय शहा काय म्हणाले ? 
पाँटिंगच्या दाव्याच्या एका दिवसानंतर भारतीय बोर्डाचे सचिव जय शाह यांनी सत्य सर्वांसमोर ठेवले आहे. शाह यांनी थेट पाँटिंगचे नाव घेतले नाही किंवा त्याला खोटारडे म्हटले नाही, परंतु प्रसारमाध्यमांशी बोलताना शाह म्हणाले की, बीसीसीआयने किंवा त्याने स्वत: कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी संपर्क साधला नाही. शाह म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये अशा बातम्या पसरवल्या जात आहेत, हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशिक्षकपदी कशी व्यक्ती हवी ? 
जय शाह यांनी सांगितले. बीसीसीआय सचिव म्हणाले की, बोर्ड अशा व्यक्तीची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करू इच्छित आहे, ज्याला भारतीय क्रिकेटची सखोल माहिती आहे आणि विविध स्तरांवरून पुढे आले आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी भारतीय देशांतर्गत क्रिकेटची समज आणि ज्ञान असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बोर्डाचा विचार स्पष्ट करताना शाह म्हणाले की, टीम इंडियाचा स्तर आणखी उंचावणे सर्वात महत्त्वाचे आहे.

लँ