टीम इंडिया टीम टी-20 वर्ल्ड कप जिंगल्यानंतर गुरुवारी बारबाडोसवरुन नवी दिल्लीत दाखल झाली. यावेळी त्यांचे विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले. काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्कार आणि स्वागत होणार आहे. त्यानंतर दुपारी मुंबईत विजयी यात्रा होणार आहे.
टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्कार आणि स्वागत होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ मुंबईसाठी रवाना होणार आहे.
मुंबईत नरिमन पॉइंट ते वानखेड़े स्टेडियमपर्यंत खुल्या बसमधून भारतीय संघातील खेळाडूंची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंत संध्याकाळी BCCI कडून 125 कोटी रुपयाचे परितोषिक टीम इंडियातील खेळाडूंना देण्यात येणार आहे.
टीम इंडियाचा कार्यक्रम असा
06:00 hrs: दिल्ली विमानतळावर आगमन
06:45 तास: ITC मौर्या, दिल्ली येथे आगमन
09:00 वाजता: ITC मौर्य येथून पंतप्रधान कार्यालयासाठी प्रस्थान
10:00 – 12:00 वाजता: पंतप्रधान कार्यालयात समारंभ
12:00 वाजता : ITC मौर्या साठी प्रस्थान
दुपारी 12:30: ITC मौर्या येथून विमानतळासाठी प्रस्थान
14:00 वाजता: मुंबईसाठी प्रस्थान
16:00 तास: मुंबई विमानतळावर आगमन
17:00 वाजता: वानखेडे स्टेडियमवर आगमन
17:00 – 19:00 वाजता: खुल्या बसमधून विजयी मिरवणूक
19:00 – 19:30 वाजता: वानखेडे स्टेडियमवर छोटा समारंभ
19:30 वाजता: हॉटेल ताजसाठी प्रस्थान