Team India Head Coach : आता गौतम गंभीरनेही व्यक्त केली इच्छा; पहा व्हिडिओ

टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण असेल, हा प्रश्न गेल्या महिनाभरापासून सर्वांच्याच ओठावर आहे. T20 विश्वचषक 2024 नंतर, संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे . त्यामुळे बीसीसीआय नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. या शर्यतीत अनेक दिग्गजांची नावे पुढे आली आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी स्टार सलामीवीर गौतम गंभीरचे नाव आघाडीवर आहे. आता पहिल्यांदाच गंभीरने यावर उघड वक्तव्य केले असून, यावरून ते  प्रशिक्षक होणार हे निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत.

बीसीसीआयने गेल्या महिन्यातच टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बदलणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, बोर्डाचे तत्कालीन सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले होते की, सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविडही पुन्हा अर्ज करू शकतात. बोर्डाने अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ मे ठेवली होती. वृत्तानुसार, द्रविड पुन्हा प्रशिक्षक बनण्यास तयार नाही, परंतु यादरम्यान रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर, स्टीफन फ्लेमिंग यांसारख्या दिग्गजांशी संपर्क साधल्याच्याही चर्चा होत्या. यापैकी बोर्डाने पाँटिंग-लँगरशी संपर्क नाकारला होता.

 प्रशिक्षक होण्यावर गंभीर पहिल्यांदाच बोलला

या सर्वांशिवाय गंभीरशी संपर्क झाल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या पण बीसीसीआयने कधीच त्याचा इन्कार केला नाही की गंभीर यावर काहीही बोलला नाही. आता पहिल्यांदाच गंभीरने टीम इंडियाच्या प्रशिक्षकाबद्दल विचारलेल्या थेट प्रश्नाला त्याच्याच अचूक शैलीत उत्तर दिलं आहे. केकेआरला आयपीएल चॅम्पियन बनवल्यानंतर अबुधाबीमध्ये सुट्टी घालवणाऱ्या गंभीरने येथे एका कार्यक्रमादरम्यान टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली आणि मला तसे करायला आवडेल असे सांगितले.

एका मुलाने केली जबरदस्ती 

या प्रश्नावर आतापर्यंत मौन बाळगणाऱ्या गौतम गंभीरला अखेर या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागले आणि एक मूल त्याचे कारण ठरले. पीटीआयच्या वृत्तानुसार, कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने गंभीरला टीम इंडियाचा प्रशिक्षक बनून विश्वचषक जिंकण्याबद्दल विचारले असता गंभीर म्हणाला की, आतापर्यंत तो या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळत होता पण यावेळी त्याला तसे करण्यास भाग पाडले गेले.

टीम इंडियाचे माजी स्टार सलामीवीर म्हणाले की, मला टीम इंडियाचे प्रशिक्षक बनायला आवडेल कारण एखाद्या देशाच्या संघाचा प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान असू शकत नाही. गंभीरने याला 140 कोटी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांचे प्रतिनिधित्व म्हटले आहे. ते म्हणाले की 140 कोटी भारतीय जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा ते भारताला विश्वचषक जिंकण्यास मदत करतील. तो म्हणाला की विश्वचषक जिंकण्यासाठी न घाबरता खेळणे सर्वात महत्त्वाचे आहे.