क्या बात है…टीम इंडियाने रचला इतिहास

नवी दिल्ली : भारतीय संघाने नागपूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयाचा टीम इंडियाला आणि भारतीय खेळाडूंना आयसीसी कसोटी क्रमवारीत खूप मोठा फायदा झाला आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ट्वेंटी-२०, वन डे व कसोटी या तीनही फॉरमॅटमध्ये आता भारतीय संघ नंबर वन आहे.

भारताचा फिरकीपटू आर अश्विन हा पुन्हा एकदा टॉप टेनमध्ये आला आहे. ३६ वर्षीय गोलंदाज कसोटी क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स नंबर वन वर आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नागपूर कसोटीत शतक झळकावले होते आणि तोही १०व्या क्रमांकावरून ८व्या क्रमांकावर आला आहे. भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल हा सहा स्थानांच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर आला आहे.

भारतीय खेळाडूंचे वर्चस्व

ट्वेंटी-२० नंबर वन फलंदाज – सूर्यकुमार यादव
वन डेत नंबर वन गोलंदाज – मोहम्मद सिराज
कसोटीत नंबर वन ऑल राऊंडर – रवींद्र जडेजा
कसोटीत नंबर दोन गोलंदाज – आर अश्विन
कसोटीत नंबर दोन ऑल राऊंडर – आर अश्विन
ट्वेंटी-२०त नंबर दोन ऑल राऊंडर – हार्दिक पांड्या