---Advertisement---

टीम इंडियाची इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेसाठी यादी जाहीर, जाणून घ्या कुणाला संधी, कुणाला डच्चू ?

---Advertisement---

इंग्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची यादी समोर आली आहे. या संघात १४ महिन्यांपासून मैदानाबाहेर असलेल्या मोहम्मद शमीला ट्वेंटी-२० संधी देण्यात आली आहे. तर विकेटकीपर ऋषभ पंतला संघातून वगळण्यात आले आहे.

मोहम्मद शमी, जो २०२३ च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. तथापि, मागील काही महिन्यांपासून शमी भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत होता. यापूर्वी, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतही शमीच्या पुनरागमनाची शक्यता होती, परंतु आता इंग्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

विकेटकीपर ऋषभ पंतच्या ऐवजी ध्रुव जूरेलला संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, हर्षित राणा, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्थी व वॉशिंग्टन सुंदर यांना गोलंदाज म्हणून संधी मिळाली आहे.

इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार),  संजू सॅमसन (विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जूरेल (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्थी, वॉशिंग्टन सुंदर.

इंग्लंडविरुद्ध भारत ट्वेंटी-२० मालिका वेळापत्रक 

२२ जानेवारी : पहिला सामना (इडन गार्डन, कोलकाता) – संध्याकाळी ७.०० वाजता
२५ जानेवारी : दुसरा सामना (एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई) – संध्याकाळी ७.०० वाजता
२८ जानेवारी : तिसरा सामना (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, राजकोट) – संध्याकाळी ७.०० वाजता
३१ जानेवारी : चौथा सामना (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे) – संध्याकाळी ७.०० वाजता
२ फेब्रुवारी : पाचवा सामना (वानखेडे स्टेडियम, मुंबई) – संध्याकाळी ७.०० वाजता

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment