---Advertisement---

नागरिकांनो, काळजी घ्या! तापमानात आणखी वाढ होणार, ‘आयएमडी’चा अंदाज

---Advertisement---

जळगाव : जळगावसह राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून, अंगाची लाही लाही होत आहे. अशात आगामी तीन दिवस हवामान कोरडे राहणार असून कमाल तापमानात आणखी २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आगामी तीन दिवस हवामान कोरडे राहणार असून कमाल तापमानात आणखी २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात १३ व १४ मार्च रोजी ठराविक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उन्हाळ्यात दरवर्षी अनेकांना उष्माघाताचा त्रास होत असतो. अर्थात तीव्र डोकेदुखी, उलट्या, श्वास घेण्यास त्रास, त्वचा कोरडी पडून घाम येणे, बंद होणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे आदी वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे वाढत्या तापमानात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, मंगळवार, ११ रोजी जळगावात कमाल तापमान ३८.४ अंश तर किमान तापमान १७.५ अंशावर गेलं होत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment