नवी दिल्ली : मोस्ट वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा उजवा हात समजला जाणारा रहीमुल्ला तारीक वर पाकिस्तानमध्ये अज्ञात लोकांनी गोळीबार करुन हत्या केल्यानंतर आता मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. मसूद अजहर हा पाकिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात मारला गेला आहे. यासंदर्भातले काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दाव्यांनुसार सोमवारी एका बॉम्बस्फोटात मौलाना मसूद अझहर मारला गेला आहे असा दावा केला जातो आहे.
पाकिस्तानच्या सोशल मीडियावर काही पोस्ट फिरत आहेत. ज्यामध्ये हा दावा करण्यात आला आहे की जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर मारला गेला आहे. मसूद अझहर भावलपूर मशिदीतून परत येत होता. त्यावेळी पहाटे पाचच्या सुमारास अज्ञात लोकांनी स्फोट घडवला. या स्फोटात मौलाना मसूद अझहर मारला गेल्याचा दावा करण्यात येतो आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मृत्यूच्या बातमीनंतर आता संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. आता एका बॉम्बस्फोटात मौलाना मसूद अझहर मारला गेल्याचा दावा करण्यात येतो आहे. पाकिस्तानच्या सोशल मीडियानंतर आपल्याकडे X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही अनेकांनी यासंदर्भातला व्हिडीओ पोस्ट केला आहे.