पुलवामा : काश्मीर खोऱ्यात पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आज (रविवार) काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. संजय शर्मा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांनी यापूर्वी शुक्रवारी रात्री देखील आसिफ अली यांच्यावर हल्ला केला होता. आसिफ अली नमाज अदा करून मशिदीतून परत येत होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना घेरले. बिजबिहारा भागातील हसनपोरा तवेला येथे दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीचे वडील अली मोहम्मद गनई हे पोलिसात हेड कॉन्स्टेबल होते. २९ जानेवारी २०२२ रोजी मशिदीबाहेर दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.