.. म्हणून मला निवडणूक लढवायची नाहीय; ठाकरे गटाच्या उमेदवाराने केलं तिकीट परत, कोण आहे? वाचा

मुंबई । विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून टप्याटप्प्याने उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. यात काही ठिकाणी पक्षाकडून उमेदवारी न राजीनाट्यही पाहायला मिळालं. परंतु पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मिळूनही एकाने तिकीट परत केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संभाजी नगरमधून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर करत तिकीट परत केलं आहे.

यामुळे उमेदवारी दाखल करण्याच्या काळातच ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का मानला जातोय. २०१४ ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी पक्षाला तिकीट परत केले आहे. छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून प्रदीप जैस्वाल यांना तिकीट मिळाले आहे.

उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आता तनवाणी यांनी माघार जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१४ च्या निवडणुकीमध्ये किशनचंन तनवाणी आणि प्रदीप जयस्वाल ही दोघेही निवडणुकीमध्ये उतरले होते. त्याचवेळी एमआयएमने पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतं एकवटून इम्तियाज जलील यांना मतदान केले होते आणि त्याचबरोबर हिंदू मतांचे विभाजन होऊन एमआयएमचे इम्तियाज निवडून आले होते.

मागच्या निवडणुकीत २०१९ मध्ये एकटे प्रदीप जयस्वाल हे निवडणुकीच्या मैदानात होते तर किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली होती. त्यामुळे प्रदीप जयस्वाल निवडून आले होते. पण दोघांमध्ये 2024 मध्ये किशन तनवाणी निवडणूक लढवतील असे ठरलं होतं. मात्र ते आता ऐकत नसल्यामुळे निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. पण त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला गती येण्यापूर्वीच ठाकरे सेनेची एक जागा लढण्याअगोदरच हातून गेल्यात जमा आहे.