---Advertisement---

Dhule News : ठाकरे सेना सोडल्याचे लागले जिव्हारी, तरुणासह आई-वडिलांनाही मारहाण

---Advertisement---

धुळे : ठाकरे सेना सोडल्याचे जिव्हारी लागल्याने वाद निर्माण झाला. या वादाचे पडसाद हाणामारीत होऊन तरुणासह त्याच्या आई-वडिलांना मारहाण करण्यात आली. यात चाकू, लोखंडी टॉमी आदींचा वापर झाला. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.

धुळे तालुक्यातील सुकवद येथे किशोर सुकलाल साळुंखे याने उबाठा गट सोडला. याचे वाईट वाटल्याने २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास काही जणांनी साळुंखेच्या घरी येऊन जाब विचारला. किशोरसह त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ व लोखंडी टॉमी, लाकडी काठीने मारहाण केली.

या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. जखमी किशोर व त्याच्या आई-वडिलांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर किशोर साळुंखे याने सोनगीर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (७ मार्च) फिर्याद दाखल केली. यात हेमराज युवराज पाटील, उषाबाई हेमराज पाटील रा. सुकवद, ता. धुळे, दीपक शेखर पाटील, प्रवीण शेखर पाटील, ताडेपुरा, ता. अमळनेर यांच्यासह अनोळखी ६ अशा १० जणांविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. आर. वसावे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment