‘ते’ कुटुंब अवैध सावकारीचे तर बळी नाही…!

तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर जोशी । सुमारे वीस वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील सहकार अचानक प्रचंड फोफावला होता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे सहकारी पतसंस्था स्थापन करण्याची जणू शर्यत जिल्ह्यात सुरू झाली होती. एक दोन एक दोन करता करता तब्बल एक हजारापेक्षा जास्त पतसंस्था जिल्ह्यात सुरू झाल्या या पतसंस्थेच्या अडून अनेकांची सावकारी सुरू झाली. आकर्षक व्याजाचे अमिष दाखवत अनेकांना आकर्षित करून त्यांच्याकडून कोट्यावधींच्या रकमा जमा केला गेला आणि याच मार्गाने भ्रष्टाचाराची कीड पसरत गेली. नवनवीन घोटाळ्यांमुळे जळगाव जिल्हा काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या अशा सुमारे १००० पतसंस्थांमध्ये ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकल्या होत्या. त्यामुळे सहकार विभागावर पतसंस्थांवर कुठलेही नियंत्रण नसल्याचे आरोप करण्यात आले होते.

परंतु राज्य सरकारच्या सहकार्यामुळे ठेवीदारांसह पतसंस्थांना २०० कोटी रुपयांचे कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य काही वर्षांपूर्वी उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे अडचणीत आलेल्या अनेक पतसंस्थांना आर्थिक संकटातून बाहेर निघण्यास मदत झाली. जिल्ह्यातील पतसंस्था आणि नागरी बँका यांनी केलेला घोटाळा त्यांची थकबाकी आणि ध्येय ठेवींची रक्कम ही जवळपास दोन हजार कोटींच्या वर असल्याचे बोलले जात होते त्यात बी एच आर चा वाटा हा खूप मोठा असल्याचे सांगितले जात होते त्यासोबत भुसावळ, चोपडा, जळगाव, आणि रावेर तालुक्यातील काही प्रमुख पतसंस्थांमध्ये असलेली ध्येय ठेवी आणि थकीत कर्जे यांची रक्कम मोठी होती. त्यांचा व्याजाचा आकडा हा सातत्याने बदलत असतो संस्थांवर बसवलेल्या व्यवसायिकांना ठेविदारांना तोंड देताना येत असे आयुष्याची कमाई अनेकांनी पतसंस्थेमध्ये ठेवली आणि अक्षरशः भिकेला लागण्याची वेळ कुटुंबांवर आली.

पतसंस्थेचे संस्थापक म्हणजे जणू सावकारच त्यांनी अनेक नातेवाईकांच्या नावाने कर्ज उचलून आयुष्याची दिवाळी केली हे सावकार अजूनही ग्रामीण भागात राजे आहेत. दोन दिवसांपूर्वीची घटना बघा ना जळगाव तालुक्यातील वडली येथील एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्याचा प्रयत्न केला या घटनेत कुटुंबप्रमुख नारायण दंगल पाटील यांचे निधन झाले तर मुलगा पत्नी अत्यवस्थ होती. वैद्यकीय कामासाठी खाजगी व्यक्तीकडून त्यांनी पैसे घेतले पैसे वेळेत फेडू तर शकले नाहीत पण हातची शेती ही गेली खाजगी कर्जाच्या दृष्ट चक्रात हे कुटुंब अडकले आणि नैराश्याच्या गर्तेत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. कुटुंबप्रमुखाचा बळी गेला त्यामुळे ही घटना चर्चेत आली मात्र सावकारी कर्जाचा विषय आजही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत असतो.  शेतकरी कर्ज झटपट मिळते म्हणून सावकारांकडे वळतात आणि त्यात फसगत होते पैसे देताना गोड बोलणारा सावकार नंतर आपले खरे रूप दाखवतो.  इकडे आमचा सहकार विभाग कारवाई केली म्हणून पाठ थोपटून घेत असतो मंत्री ही कौतुक करतात पण वास्तव काय हे कोणीही फारसे गांभीर्याने घेत नाही.

अनेक शेतकरी याच समस्येमुळे आपले आयुष्य संपवतात शासन मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला लाखाची मदत करतात पण हे पैसे किती दिवस पुरणार त्यानंतर त्या कुटुंबांची वणवण सुरूच राहते पतसंस्थेच्या जाळ्यात अडकलेला अनेक कुटुंबांची ही स्थिती झाली सहकार विभागाने ग्रामीण भागात सर्वेक्षण करून अशा पद्धतीने व्यवहार करणाऱ्या सावकारांचा पर्दाफाश करणे गरजेचे आहे यासाठी प्रत्येक तालुका अधिकाऱ्याला सतत सतर्क राहण्याचा सूचना दिला गेल्या पाहिजे वडलीचे कुटुंब आत्महत्या करते तीच परिस्थिती अन्य शेतकरी कुटुंबावर येऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे शेतकरी कर्ज घेऊन शेत फुलवतो पण नैसर्गिक आपत्तीने किंवा अन्य कौटुंबिक संकटामुळे अडचणीत येतो नंतर काय होते हे वडलेचा घटनेवरून लक्षात येते सावकारी फेऱ्याचा नायनाट करणे हे सरकार विभागाचे काम आहे त्यामुळे या कुटुंबांच्या टोकाच्या निर्णयाला गांभीर्याने घेणे ही गरजेचे आहे.