पाचोरा तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे उद्यापर्यंत होणार पूर्ण : उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती

---Advertisement---

 

पाचोरा : तालुक्यातील ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. घरांचे, जनावरांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे युद्धपातळीर करण्यात येत असून ते उद्यापर्यंत सर्वंच पंचनामे पूर्ण होतील अशी ग्वाही उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी दिली आहे.

सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे लुक्यातील शिंदाड, राजुरी, निंभोरी, वानेगाव, वाडी-शेवाळे, वेरूळी, पिंपळगाव (हरेश्वर) सह परिसरात नदी-नाल्यांना मोठा पूर आला. डोंगर माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने गावांमध्ये शिरकाव करत घरांचे, शेतीचे तसेच गुराढोरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागाची पाहणी करुन मंत्री गिरीश महाजन यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यानुसार प्रशासनातर्फे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम सुरु केले आहे.

पूरामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली असून घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचेही प्राथमिक अहवालात समोर आले आहे तालुक्यातील शिंदाड व पिंपळगाव (हरेश्र्वर) महसूल मंडळातील 11 गावात 648 घरे यांचे पंचनामे काल रात्री उशिरा पर्यंत पूर्ण झाले आहे. तर शेतीचे पंचनामे कालपासून सुरू करण्यात आले असून अतिरिक्त 20 कर्मचाऱ्यांची टीम आज पुन्हा पंचनामेसाठी पाठवण्यात आली आहे. नुकसान जास्त असल्याने पंचनामे करण्यासाठी वेळ लागत आहे. कृपया शेतकरी बांधवांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आज आणि उद्या सर्वच पंचनामे होतील अशी माहिती उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---