एके 47 चे पाच काडतूस चोरले; सहाय्यक अभियंत्याला ठोकल्या बेड्या

भुसावळ : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील सहाय्यक अभियंत्याला एके- 47 बंदुकीत वापरलेले जाणारे पाच जिवंत काडतूस चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. संशयीताने चोरी केलेले काडतूस दुचाकीच्या हेड लाईटखाली लपवल्यानंतर या काडतूस जप्त करण्यात आल्या व अधिकार्‍याला बेड्या ठोकण्यात आल्या. या घटनेने फॅक्टरी प्रशासनात खळबळ उडाली आहे. सतीश जयसिंग इंगळे असे अटकेतील अधिकार्‍याचे नाव आहे.

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत असलेला सहा.अभियंता सतीश जयसिंग इंगळे याने बुधवार, 26 जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडताना दुचाकी (एम.एच.19 ए.टी.1504) च्या हेडलाईटच्या कव्हरमध्ये अ‍ॅम्युनेशन 7.62 ची एके 47 शस्त्रात वापरली जाणारे पाच जिवंत काडतूस लपवले.

हा प्रकार सुरक्षा रक्षक सी.व्ही.भारंबे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी इंगळे यास रोखून धरत हा प्रकार सुरक्षा अधिकारी हेमंत चौधरी यांना कळवला. घडल्या प्रकाराची माहिती कार्यप्रबंधक संभाजी सुधाकर पावडे यांनाही कळवण्यात आली.