तरुण भारत लाईव्ह । ५ मे २०२३। आज बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे चंद्रग्रहणाच्या वेळी मंगळ आणि शुक्र मिथुन राशीत असतील. तर मेष, बुध, सूर्य, गुरु आणि राहू मिळून चतुर्ग्रही बनतील. काही राशींच्या लोकांसाठी ही ग्रहस्थिती अतिशय शुभ आहे. म्हणजेच आजच्या चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव या राशींच्या लोकांवर राहील. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ राहील. धनलाभ होईल. अडकलेले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठीही चंद्रग्रहण शुभ परिणाम देईल. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. तुमची सामाजिक स्थिती मजबूत होईल.
धनु रास
या चंद्रग्रहणामुळे धनु राशीच्या लोकांना प्रचंड संपत्ती मिळू शकते. मालमत्ता मिळण्याची किंवा खरेदी करण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सदस्याची चांगली प्रगती होईल.
मकर रास
वर्षातील पहिले चंद्रग्रहण मकर राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मोठा लाभ देईल. तुमच्यावर कामाचा बोजा असेल, पण तुम्हाला प्रगतीही मिळेल.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण भाग्याची साथ देईल. तुम्ही प्रवासाला जाऊ शकता. धर्म-अध्यात्मात रुची वाढेल. वडिलांशी संबंध चांगले राहतील.
मीन रास
मीन राशीच्या लोकांना चंद्रग्रहण पुढील 15 दिवस लाभ देईल. तुम्हाला पैसे आणि भेटवस्तू मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील.