---Advertisement---

तमाशाच्या फडाजवळ आढळला तरुणाचा मृतदेह; परिसरात खळबळ

---Advertisement---

जळगाव : पेमबुवा महाराजांच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मनोज ज्ञानेश्वर निकम (२६) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे पेमबुवा महाराजांची यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरु आहे. दरम्यान, तमाशा सुरू असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर २५ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मनोज ज्ञानेश्वर निकम (२६, रा. हनुमंतखेडा ता. सोयगाव. जि. संभाजीनगर ) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

तरुणाच्या मृत्यूची माहिती मृताचे काका नंदकिशोर पाटील यांनी नगरदेवळा औट पोस्टला दिली. तात्काळ पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार कैलास पाटील, मनोहर पाटील, अमोल पाटील, दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत सदरील जागेचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

दरम्यान, मनोज निकम याच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागल्याचे आढळून आल्यामुळे सदरील मृतदेह पुढील चौकशीकामी जळगाव शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला. मात्र, मनोज निकम याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, मनोज निकम याचा अकस्मात मृत्यू झाला नसून त्याचा खुन करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी करत मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम होते. अखेर २६ डिसेंबर रोजी नंदकिशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात मारेकऱ्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment