खासदारकी गेली आता जाणार बंगलाही!

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना १२ तुगलक लेन हे त्यांचे शासकीय निवासस्थान सोडावे लागणार आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर लोकसभा हाऊस कमिटीतर्फे ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता राहुल गांधींना राहते घर सोडावे लागणार आहे.

खासदारकी रद्द झाल्यानंतर शासकीय निवासस्थानी त्यांना रहाता येणार नाही, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधींना आधी खासदारकी रद्द झाल्यानं घरही सोडावे लागणार आहे. राहुल गांधींचे सध्याचे निवासस्थान १२ तुगलक लेन येथे आहे.

येत्या ३० दिवसांत राहुल गांधींना हे घर सोडावे लागणार आहे. दरम्यान, ही कारवाई आकसापोटी केली जात आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे.