तरुण भारत लाईव्ह । १० मे २०२३। बुलढाणा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. खासगी ट्रॅव्हल्स बस पैनगंगा नदीत कोसळल्याने एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून, २० ते २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही खासगी ट्रॅव्हल्स बस शेगाववरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. बस चिखली रोडवरील पेठ जवळ आळी असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. जवळपास १५ फूट खोल नदीत ही बस कोसळली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.