त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची बस उलटली

नाशिक : गुजरातचे भाविक त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे ३० भाविक जखमी असून त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर इतर प्रवाशांना हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

गुजरात येथील कच्छ येथील ५७ भाविक एका खाजगी बसने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन गुजरातला परत जात असताना त्रंबकेश्वर तालुक्यातील खरपडी घाटात बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या बस मध्ये ५७ प्रवासी होते तर त्यापैकी जवळपास ३० भाविक जखमी आहे. जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी करिता दाखल करण्यात आले आहे.