रावेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे रावेर तालुका भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. यानिमित्त तालुक्यात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला तसेच पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी, राजन लासूरकर,रावेर मंडळ तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील,सावदा मंडळ तालुकाध्यक्ष दुर्गेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष महेश चौधरी, ,जिल्हा उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष अरुण शिंदे, सहकार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पाटील,विजय लोहार , बाळा आमोदकर, लखन महाजन, चंदू पाटील, महेंद्र पाटील, आशा सपकाळे, नलिनी पंत, चेतन पाटील, मनोज श्रावग, पवन चौधरी,अनंत महाजन, राम शिंदे, निलेश सावळे, योगेश महाजन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकास योजना प्रभावीपणे राबविता येतील
या निर्णयामुळे समाजातील सर्व घटकांची खरी आकडेवारी मिळून विकास योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असे मत या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.