नवी दिल्ली : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हत्या करण्यात आली. तीन तरुणांनी अतिक आणि अशरफची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर आता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे.
अतिक-अशरफची हत्या करणारे तिन्ही तरुण मीडिया रिपोर्टर असल्याचे भासवून जमावात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी अतिक-अशरफवर गोळ्या झाडल्या. अशामध्ये आता पत्रकारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या हत्येनंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय पत्रकारांच्या सुरक्षेसाठी एसओपी तयार करणार आहे. पत्रकारांना सुरक्षा देण्यासाठी गृहमंत्रालयाकडून हे पाऊल उचलले जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करणार आहे.