तरुण भारत लाईव्ह ।२० फेब्रुवारी २०२३। महाशिवरात्रीच्या पावन दिनी, संध्याकाळी मेहरूण तलावा जवळील श्री गणेश घाटावर मातृशक्ती तर्फे सामूहिक शिवस्तवन स्तोत्र गायनाचा नयनमनोहर सोहळा संपन्न झाला. कार्यक्रम ठीक साडे सहा वाजता सुरू झाला. सर्वप्रथम श्रीगणेश वंदना त्यानंतर शंखनाद आणि ओंकाराच्या निनादात सुमारे शंभर महिलांनी स्वस्तिक आणि ओम या पवित्र चिन्हांच्या आकारात स्थानापन्न होऊन, दोन्हीं हातात दिवे घेऊन शिवस्तुती, रुद्राष्टक आणि शिवतांडव स्तोत्र सादर केले. कार्यक्रमाची सांगता शंखनाद आणि मातृशक्ती द्वारे शिवशंकराची आरती करून झाली. कार्यक्रमाला शहरातील मान्यवर महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रम स्थानी उभारलेले आणि दिव्यांनी सुशोभित केलेले भव्य शिवलिंग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व मातृशक्ती कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.