मुंबई : देशातील पहिली ९०० कोटींची ग्रीन फिल्ड गुंतवणूक रायगडमध्ये येणार आहे. यापूर्वी ही गुंतवणूक ७२० कोटींची होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. एक्झॉनमोबी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॉन्टे डॉब्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “भारतातील वाढत्या ल्युब्रिकंटची (वंगण) मागणी आहेच. भारतातील स्टील उत्पादन, सिमेंट, उत्खनन आणि बांधकाम क्षेत्रांमध्ये सातत्याने वृद्धी होत आहे. औद्योगिक वाहनांची गरज लक्षात घेता ही गरज मोबिल्स ल्युब्रिकंट्सद्वारे भारतीतील फ्युएल इकोनॉमी सुसज्ज ठेवण्यासाठी आम्ही मोलाचा वाटा बजावण्यासाठी तयार आहोत.”, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “देशातील पहिली ग्रीन फिल्ड गुंतवणूक महाराष्ट्रातील रायगड जिल्हात येत असल्याचे पाहून आनंद झाला. रायगड जिल्ह्यात यामुळे शेकडो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. या प्लाटमधून दरवर्षी निर्माण होणाऱ्या ९० टक्के उत्सर्जित कचराही इतर उत्पादनांसाठी वापरला जाणार आहे.” कंपनी व्यवस्थापकांनी सह्याद्री अतिथीगृहावर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह फडणवीसांची भेट घेतली. कंपनी व्यवस्थापनाने या संदर्भात उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांचे आभारही मानले आहेत.