Bhusawal News : पूर्व वैमनस्यातून भुसावळ शहरातील रहिवासी तथा हद्दपार आरोपी मुकेश प्रकाश भालेरावची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात मृताची पत्नी सुरेखा भालेराव व रोहन तायडे (भुसावळ) यांचा सहभाग आढळल्याने त्यांना शनिवारी अटक करण्यात आली. रविवारी भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना स२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
गुरुवारी (१३ मार्च) हद्दपार आरोपी मुकेश भालेराव हा मध्यरात्री भुसावळातील भिलवाडा भागातील घरी आल्यानंतर संशयितांनी त्याची धारदार शस्त्राने हत्या करीत मृतदेह तापी नदीपात्राजवळील काकाचा ढाब्यामागील घनदाट जंगलात पुरला होता. शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून खुनाची उकल करीत सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
सुरुवातीला मनोज राखुंडे, जितू भालेराव यांना अटक करण्यात आली तर शनिवारी मृताची पत्नी सुरेखा भालेराव व रोहन तायडे (भुसावळ) यांना अटक करण्यात आली. संशयितांना रविवारी न्यायालयाने २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर ताब्यात घेण्यात आलेले दोघे अल्पवयीन बाल न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, खून प्रकरणात संशयित विकास राखुंडे हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मृत मुकेशच्या मृतदेहाचे जळगाव येथे विच्छेदन करण्यात आले. मात्र पीएम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यू कसा झाला? याबाबत CRI अधिक स्पष्टता येणार आहे. मृत मुकेशचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर अनेक बार्बीचा खुलासा होणार आहे.