नागपूर : कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थानच्या बांधकामाधीन गेटचा एक भाग शनिवारी रात्री कोसळला. या अपघातात १६ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नागपूरमधील खापरखेडा ते कोराडी मंदिर रस्त्यावर असलेल्या गेटच्या बांधकामादरम्यान, एका बांधकामाधीन संरचनेचा एक भाग कोसळला. एनडीआरएफ आणि पोलिसांनी बचाव कार्य सुरू केले होते. नागपूरचे डीएम विपिन इटनकर म्हणाले की, स्लॅबसाठी आरसीसी (रिइन्फोर्स्ड सिमेंट काँक्रीट) टाकले जात असताना ते कोसळले.
डीएम म्हणाले की, काम करणाऱ्या कामगारांना किरकोळ दुखापत झाली आहे. काहींना नंदिनी रुग्णालयात आणि काहींना मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नागपूरचे डीएम म्हणाले की, प्रोटोकॉलनुसार, एनडीआरएफ, पोलिस विभाग आणि महसूल विभाग येथे उपस्थित आहेत. मशीनच्या मदतीने ढिगारा हटवण्यात येत आहे. त्यांनी जनतेला अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही केले.
अपघाताच्या चौकशीचे आदेश
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एनएमआरडीए) महानगर आयुक्त संजय मीना यांनी सांगितले की १५-१६ जण जखमी झाले असून, त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकृत निवेदन दिले आहे. येथे कोराडी मंदिराचे बांधकाम सुरू होते. एनएमआरडीए अंतर्गत कंत्राटदार येथे काम करत होते. हे कसे घडले हे पूर्ण चौकशीनंतरच बोलता येईल.