भूकंपाने 126 इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या, भारतातही जाणवले धक्के

भूकंपाचे जोरदार झटके जाणवले आहेत. या भूकंपामुळे शेडोंगमध्ये हाहा:कार उडाला आहे. हा भूकंपाचा धक्का इतका भयानक होता की त्यामुळे इमारती स्प्रिंगसारख्या हलू लागल्या. त्यामुळे लोक घाबरून इमारतीबाहेर पळाले. पळताना अनेकजण पडले, धडपडले. अनेकांना पळतानाच पडल्याने मार लागला. अनेकजण जखमीही झाले. आज मध्यरात्री 2 वाजून 33 मिनिटांनी हा भूकंप झाला.

देशभरातील लोक गाढ निद्रेत असताना हा धक्का जाणवला. या भूकंपाने किती नुकसान झालं हे रात्री कळलं नाही. पण उजाडताच धक्कादायक चित्र समोर आलं. या भूकंपामुळे 126 इमारती जमीनदोस्त झाल्या. अनेक घरे कोसळली. या भूकंपात आतापर्यंत 21 लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजूनही समोर आलेला नाही. मात्र, भूकंपामुळे चीन संपूर्ण हादरून गेला आहे.

चीनप्रमाणे भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरपासून ते चंदीगड-पंजाबमधील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीतील भूकंपाची तीव्रता 5.8 एवढी नोंदवली गेली आहे. शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 एवढी नोंदवली गेली होती. जूनपासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये छोटे मोठे 12 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.